पुणे विभागातील 8 महिन्यांमध्ये उत्पन्नात वाढ
पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, लोणंद, बाराममतमी येथून बिहार, पश्चिम बंगाल व इतर राज्यात साखर पाठविली आहे. यामुळे पुणे रेल्वे विभागातून साखरेच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. त्याचा फायदा रेल्वे आणि साखर कारखानदारांना होत आहे. साखर वाहतुकीतून गेल्या 8 महिन्यात पुणे रेल्वे विभागाला तब्बल 220 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 100 कोटींनी वाढ झाली आहे.
पुणे रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वात जास्त उत्पन्न मालवाहतुकीमधून मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने साखर, ऑटोमोबाईल आणि पेट्रोलियम पदार्थ यांचा समावेश आहे. परंतु गेल्या वर्षी विभागातून साखर उत्पन्नात घट झाली होती. त्यामुळे रेल्वेची साखर वाहतूकदेखील कमी झाल्याचे दिसून आले होते.
पण यंदा पुन्हा साखर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचेे दिसून आले आहे. गेेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत या 8 महिन्यात सव्वाचार लाख टन साखरेची वाहतूक झाली होती. पण यंदा नोव्हेंबरअखेर 8 लाख टन साखरेची वाहतूक झाली आहे. त्यामधुन रेल्वेला 220 कोटी रूपयांनी उत्पन्न वाढले आहे. (लोकमत, 17.12.2024)