तासगाव ः केजीएस शुगर अॅण्ड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि.चा अधिकृत ताबा रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी उत्साहात पूर्ण झाला. मॉनिटरिंग बोर्डाचे चेअरमन पंकज श्याम जोशी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी नवीन व्यवस्थापनाचे औपचारिक स्वागत करताना समारंभाला विशेष महत्त्व आले होते.
नवीन नेतृत्वाखाली ग्रेनॉच इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय होळकर, केेजीएस शुगर अॅण्ड इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य होळकर, ग्रेनॉचचे मुख्य वित्त अधिकारी अजय खैरनार, केजीएस शुगरचे जीएम सुखदेव शेटे यांनी जबाबदारी स्वीकारली. (पुढारी, ०३.११.२०२५)