anekant.news@gmail.com

9960806673

गळीत हंगामाची लगबग, ऊसतोडणी मजूर दाखल


सीमाभागातील चित्र, गळीत हंगामाला काही दिवस बाकी
अंकली ः राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास अद्याप काही दिवसच बाकी आहेत. तरीही चिकोडी उपविभागातील भागात आतापासूनच ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्याा दाखल होऊ लागल्या आहेत. गावाबाहेर मजुरांनी झोपड्या उभ्या केल्या आहेत. यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचा शासनाचा आदेश असला तरीही सर्वच साखर कारखान्याने उसाची मोळी टाकून कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे.
सध्या तालुक्यातील काही साखर कारखान्यांची ऊसतोडणी सुरू आहे. अन्य कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास १०-१२ दिवस असले तरीही अनेक तोडणी कंत्राटदारांनी महाराष्ट्रातील विविध भागातून ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या आणून ग्रामीण भागातील रिकाम्या जागी उतरवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्या मोठ्याा प्रमाणात दिसून येत आहेत.
महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होण्यास अद्याप उशिरा असला तरी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यातील ऊसतोडणीचे कामगार कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमणात येऊ लागले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा होऊ लागल्याने राज्यातील साखर कारखान्यांना अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
यंदाच्या हंगामात पाऊस व उसाला मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने यंदा उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापासूनच साखर कारखान्याने ऊसतोडणी कामगार आणून ऊस गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. साखर कारखान्याच्या कृषी विभागाचे कर्मचारी रोज शेतकर्‍यांच्या बांधावर फिरून ऊस आपल्याच कारखान्याला पुरवठा करावा, असे आवाहन करत आहेत. (पुढारी, २१.१०.२०२५)