anekant.news@gmail.com

9960806673

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टच्या अध्यक्षपदी सोहन शिरगावकर

नागाव ः साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था द डेक्कम शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे उद्योजक सोहन शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
सोहन शिरगावकर हे एस.बी. रिशेेलर्स प्रा.लि. या कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीमध्ये साखर कारखान्यासाठी लागणार्‍या रोलरचे उत्पादन घेतले जाते. तसेच गोकुळ शिरगाव येथील कंपनीत ऊसतोडणी यंत्रांची निर्मिती केली जाते. कागल येथील कंपनीमध्ये साखर कारखान्यासाठी लागणार्‍या इतर साहित्याची निर्मिती केली जाते. या व्यतिरिक्त कर्नाटकमधील उगार शुगर लि.चे कार्यकारी संचालक आहेत. पवनचक्कीसाठी लागणार्‍या साहित्याची निर्मिती करणार्‍या सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीज लि.चे ते सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. (सकाळ, ३०.०७.२०२५)