अलीकडील काही वर्षातील सतत आणि अचानक होणार्या हवामाानातील बदलामुळे शेतीतील अनेक पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. आपल्या भारतामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात नगदी व भरपूर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून केली जाते. परंतु अलीकडील हवामानातील बदलामुळे, पिकाचे अशास्त्रीय नियोजनामुळे त्याचे उत्पन्न घटत चालले आहे.
यामधील हवामानातील बदलामुळे होणार्या उत्पन्न घट कशी होत आहे याचाही विचार करणे फार गरजेेचे आहे त्याचा पुष्कळ अभ्यास ही झालेले आहे.
भारतात ८० अंश उत्तर ते ३३० अंश उत्तर अक्षांशापर्यंत देशभरात उसाची लागवड केली जाते आणि ते एक महत्त्वाचे व्यापरी पीक आहे. उगवणीसाठी ३२-३८ अंश ल हे आदर्श तापमान असते आणि पक्व होण्यासाठी १२ अंश उते १४ अंश उतापमान इष्ट असते. उसाच्या वाढीचे महत्त्वाचे टप्पे उगवण, फुटवे येणे, सुरूवातीची वाढ, सक्रिय वाढ आणि लांबी वाढणे.
हवामानातील बदल, विशेषतः अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि दुष्काळ, भारताच्या ऊस साखर उद्योगाला मोठा धोका निर्माण करत आहेत. या बदलांमुळे उसाची उत्पादकता कमी होते. साखरेचे प्रमाण घटते आणि पिकाच्या गुणवत्तेला हानी पोहोचते, ज्यामुळे अनेकदा साखरेचे उत्पादन कमी होते. याच्या प्रमुख परिणामांमध्ये पिकाची पक्वता उशिरा होणे, पाण्याची मागणी वाढणे आणि कीड प्रादुर्भाव वाढणे यांचा समावेश होतो.
कांड्याचे ताजे वस्तुमान (डींरश्रज्ञ ऋीशीह चरीी) आणि सुक्रोज वस्तुमान (र्डीलीेीश चरीी) हे ऊस पिकाचे महत्त्वाचे घटक आहेत, जे त्याचे आर्थिक महत्त्व ठरवतात. अनेक अभ्यासांमध्ये हवामानातील बदलांमुळे उसाच्य उत्पादनात घट झाल्याचे आढळून आले आहे आणि तापमानात प्रत्येकी १ डिग्री वाढीसह त्यात २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. (र्घीारी शीं रश्रश्र., २०१५)
हवामान बदलाचे प्रमुख परिणाम
* घटलेले उत्पन्न - तीव्र दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या वाढीच्या अवस्थांमध्ये अडथळा होतो. दुष्काळामुळे उत्पन्नात मोठी घट होते, तर कोरड्या हवामानामुळे पांढरी अळी आणि मावा यांचा प्रादुर्भाव वाढतो.
* कमी साखर उतारा - उष्ण, दमट हवामान आणि कमी सूर्यप्रकाशामुळे सुक्रोजच्या संचयनावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे साखर उतार्यात कमी होताो.
* तापमानाचे परिणाम - तापमानात २ अंश उ ते ४ अंश उपर्यंत वाढ झाल्यास उत्पादनात ९ टक्केपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. उच्च तापमानामुळे पाण्याची गरज वाढते आणि बाष्पीभवन उत्सर्जनाचा दर वाढतो. ज्यामुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होतो.
* पिकांमधील बदल - वर्षाच्या उत्तरार्धात किमान तापमान वाढल्यामुळे काही जातींमध्ये तुरा येण्याचे प्रमाण वाढते.
* ऊस तोडणीतील व्यत्यय - अतिवृष्टीमुळे पाणी साचते आणि काढणी व वाहतुकीत व्यत्यय येतो.
उद्योगावरील परिणाम -
घटलेले उत्पादन ः प्रतिकूल हवामान जो की विशीष्ट कालावधीत (उदा. सप्टेंबर/ऑक्टोबर) होणारा अतिवृष्टी, याम ुळे देशातील साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. ज्यामुळे निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात.
आर्थिक परिणाम ः उत्पादनातील अस्थिरतेमुळे साखरेच्या किमतीत चढ-उतार होतो. ज्याचा थेट परिणाम शेतकर्याांच्या उत्पन्नावर आणि साखर कारखान्यांच्या उत्पादकतेवर होतो.
उसाला पर्याय
हवामान सततच्या बदलामुळे धोका निर्माण होत असल्याने उसाला पर्यायी पीक धोधणे गरजेचे बनत चालले आहे. साखर उत्पादनासाठी किंवा हवामान बदलास तोंड देऊ शकणारे पर्याय म्हणून इतर पिकांचा शोध धेतला जात आहे. त्यापैकी काही पर्याय खालील प्रमाणे
शुगर बीट ः साखरेचा एक प्रमुख स्त्रोत (विशेषतः समशीतोष्ण प्रदेशात) ज्याला उसापेक्षा कमी पाणी लागते, मात्र उष्णकटिबंधीय हवामानात तो उसाला पर्याय होऊ शकत नाही.
डुशशीं डेीसर्हीा - हे अत्यंत दुष्काळ प्रतिरोधक पीक असून, याच्या कांडीमधील रसात साखर तयार होते, ज्यामुळे नीम शुष्क प्रदेशांमध्ये हा एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
र्डीसरी झरश्रा/ऊरींश झरश्रा - या झाडाच्या रसावर प्रक्रिया करून साखर बनवली जाते.
स्टीव्हिया ः साखरेचे प्रमाण जास्त असलेला एक नैसर्गिक गोडवा, जो एक आरोग्यदायी आणि कॅलरी मुक्त पर्याय म्हणून उपयुक्त आहे.
हवामानातील बदल सहन करणारे वाणाचा विकास करणे - कमी पाण्याची उपलब्धता आणि उच्च तापमानासाठी अधिक अनुकूल असलेल्या उसाच्या नवीन वाणांचा विकास करणे.
यावर सखोल अभ्यास होणे काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यामधील साखर कारखान्यावरील व शेतकर्यांवरील धोका टाळणे शक्य होऊ शकते. - लेखक भरतेश कमते (साखर तज्ञ), दादासाहेब माळी (पर्यावरण तज्ञ) (प्रेसनोट, १०.०४.२०२६)