लातूर ः राज्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात ८ टीपीडी क्षमतेच्या म्हणजे ८ मे.टन प्रति दिवस कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दि. ७ मार्च रोजी पार पडला. मांजरा कारखान्यातून आता दररोज ८ मे.टन कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस निर्मिती होणार आहे. सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आधुनिकीकरणाकडे भक्कम पाऊल टाकल्याचे यावेळी अध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले.
अध्यक्ष देशमुख म्हणाले की मांजरा साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. ऊसतोडणीचे १०० टक्के हार्वेस्टरने नियोजन करून कारखान्याने देशासमोर आदर्श निर्माण केला. सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आध ुनिकीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले असून, कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत, असे सांगून भविष्यात अधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.