anekant.news@gmail.com

9960806673

कुंभी कासारी कारखान्याची २०२५-२६ ची संपूर्ण एफआरपी अदा

चेअरमन आ. चंद्रदीप नरके यांची माहिती
कोपार्डे ः येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची हंगाम २०२५-२६ ची एफआरपी ३५६० रूपयांप्रमाणे संपूर्ण ऊस बिले ऊस पुरवठाधारकांना अदा केल्याची माहिती कारखान्यचे चेअरमन आ. चंद्रदीप नरके यांनी दिली. आ. नरके म्हणाले, कारखान्याने हंगाम २०२५-२६ मध्ये ४ लाख ८८ हजार ८७० मे.टन ऊस गळीत करून ६ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १२.५५ टक्के आहे.
हंगाम सुरूवातीपासून ते दि. १५ जानेवारी अखेर यापूर्वी ऊस बिले अदा केली आहेत. उर्वरित दि. १६ जानेवारी २०२६ ते हंगाम संपेपर्यंतच्या गळितास आलेल्या १ लाख ६५ हजार १५० मे.टन उसाची बिलाची रक्कम रूपये ५८ कोटी ७९ लाख ३७ हजार दि. ३१ मार्च रोजी ऊस पुरवठाधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. अशा प्रकारे कारखान्याने एफआरपीप्रमाणे संपूर्ण ऊस बिलाची एकूण रक्कम रूपये १७४ कोटी ३ लाख ८० हजार ऊस पुरवठाधारकांना अदा केेली आहे. (पुढारी, ०५.०४.२०२६)