माळेगाव ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व परिसरातील मुकादमांचा सत्कार कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार गळीत हंगाम २०२६-२७ ची पूर्वतयारी म्हणून ऊसतोडणी वाहतूक संघटनेशी करार उपाध्यक्ष संगीता कोकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात १४-१५ लाख मे.टन ऊस उत्पादन घेण्याचा मानस आहे. पहिल्य दिवसापासून गेटकेन उसाचे गाळप होणार आहे. गेटकेनधारकांनी जास्तीत जाास्त उसाची नोंद कारखान्याकडे करावी. गाळप हंगाम २०२६-२७ साठी १२०० बैलगाडी, ७०० ट्रॅक्टर गाडी, ३५० वाहने, २० हार्वेस्टर करार केले आहेत. - संगीता कोकरे, उपाध्यक्षा, माळेगाव साखर कारखाना (पुण्यनगरी, ३०.०५.२०२६)