anekant.news@gmail.com

9960806673

माळेगाव साखर कारखाना कांडे बिल २०० रूपये प्रतिटन देणार

कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांची माहिती
शिवनगर ः माळेगाव सहकारी साखर कारखाना मागील गळीत हंगामात तुटून आलेल्या कांडे बिलापोटी २०० रूपये प्रतिटन देणार आहे. मंगळवार दि. १३ मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे कारखाना अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी सांगितले.
माळेगाव साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये तुटून आलेल्या उसाचा पहिला हप्ता २८०० रूपये तर दुसरा हप्ता ३३२ रूपये प्रतिटन ऊस उत्पादक सभासदांना दिला आहे. त्यामुळे सभासदांना आजअखेर एकूण ३१३२ रूपये प्रतिटन मिळाले आहेत. दरम्यान याच गाळप हंगामातील तुटून आलेल्या उसाच्या बिलापोटी कांडे बिलाच्या माध्यमातून प्रतिटन २०० रूपये मिळणार आहेत. त्यामळे मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला एकूण ३३३२ रूपये प्रतिटन सभासदांना मिळतील.
कांडे बिलापोटी दिल्या जाणार्‍या रकमेसाठी एकूण जवळपास १६ ते १७ कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे. जूनमध्ये आडसाली उसाची लागण आदींसाठी ही रक्कम ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाईल, असे अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी सांगितले. (पुढारी, १४.०५.२०२५)