रांजणी -13 नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याचा 23 वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला असून कारखान्याने सरासरी दररोज 7000 मे.टन याप्रमाणे मराठवाडयात सर्वाधीक ऊस गाळप करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.
े नॅचरल शगरने चालू गळीत हंगामा मध्ये एकूण 7.00 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले असून त्याप्रमाणे ऊस तोडणी व वाहतूकीचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार आतापर्यंत अत्यंत समाधानकारक गाळप होत असून उद्दीष्टपुर्ततेकडे जोमाने वाटचाल चालू आहे. सद्यस्थितीत साखरेला बाजारात मागणी आणि उठाव असल्यामुळे नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामा मध्ये ऊसाला रू. 2700/- प्रति मे.टन याप्रमाणे पहिली उचल देण्याचे घोषीत केले आहे. नॅचरल शुगरकडे ऊस गाळपास आल्यानंतर प्रत्येक पंधरवाडयाचे बील ऊस पूरवठादारांचे बॅंक खात्यावर जमा करणार असल्याचे ही, नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी या वेळी सांगितले.
नॅचरल शुगरला प्रतिदिवस 7000 मे.टन ऊसाचा पुरवठा होत असून त्यासाठी लागणा-या संपूर्ण तोडणी वाहतूक यंत्रणेची व्यवस्था यापूर्वीच कारखान्याने केलेली आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेवून जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी ऊसाचा पुरवठा करावा, जेणे करून उद्यीष्टांनुसार चालू गळीत हंगामात ऊसाचे गाळप करून ऊसाला जादा दर देणे शक्य होईल. तसेच नॅचरल शुगरच्या विविध उपक्रमाद्वारे मिळणा-या उत्पन्नांमधून सुद्धा ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन बी.बी.ठोंबरे यांनी केले.