anekant.news@gmail.com

9960806673

टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर पडला आहे. खरे पाहिले तर आतापर्यंत ऊस नेण्यासाठी कारखान्याने हालचाली सुरू करायला पाहिजे होत्या. परंतु काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चिंता सतावू लागली आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात इसापूर व सिद्धेश्वर या दोन धरणांचे पाणी मिळते. या पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बागायती पिकांसह उसाचीही लागवड केली आहे. त्याचबरोबर हळद, केळी आदीं पिकेही घेणे सुरू केले आहे. गतवर्षीप्रमाणेच याहीवर्षी उसाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे.

कुरुंदा भागात टोकाई सहकारी साखर कारखाना असून तो कारखाना सहयोगी तत्त्वावर देण्यात आला. त्यामुळे सुरळीतपणे गाळप हंगाम होईल, अशी अशा सर्वच शेतकऱ्यांना आहे. परंतु नेमके काय घडले की, नोव्हेंबर महिना अर्धा उलटून गेला तरी अजूनही ऊस नेण्यासाठी कारखान्याच्या हालचाली काही दिसत नाहीत.शेताजवळच्या कारखान्याने ऊस नेला तरी आपण ऊस कोणाला द्यावा, इतर कारखान्याने ऊस नेतील की नाही? असे एक ना अनेक प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत.

गाळपासाठी ऊस नेण्याच्या हालचाली मंदावल्या
■ गाळपासाठी ऊस नेण्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. टोकाई कारस्थाना गाळपाबाबत का काही बोलत नाही हेही कळायला मार्ग नाही.
■ गाळप हंगाम किती दिवस लांबणीवर पडणार आहे? हा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेत पाडत आहे.
■ कारखान्याचे गाळप होत नाही हे पाहून शेतकरी गुळाच्या कारखान्याला ऊस नेऊन देत आहेत. हक्काचा कारखाना गाळप का लांबणीवर पाडत आहे हे मात्र शेतकऱ्यांना कळत नाही. 'टोकाईने' लवकरात लवकर गाळप सुरू करावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.