सर्वच साप्ताहिक साखर डायरी वाचक वर्गांना कळवण्यात आनंद वाटतो आहे की, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने साप्ताहिक साखर डायरीस 14 वर्षे पूर्ण होत आहे. त्याबद्दल सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार...!!!
कै. श्री. अजित नरदे (सर) यांनी सुरूवात केलेली साप्ताहिक साखर डायरी ही साखर उद्योगाबद्दल संपूर्ण माहिती देणारी प्रसिद्ध आणि लोकप्रिय मराठी साप्ताहिक आहे. हे अनेकांत प्रकाशनचे प्रमुख मराठी वृत्तपत्र आहे. जागतिक साखर उद्योगातील घडामोडी, बातम्या तसेच प्रमुख मान्यवरांचे लेखाचा समावेश असलेले एक वाचनीय पेपर.
साखरेची इत्यंभुत माहितीसोबत आपणस गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यातील ऊस गाळपाची माहिती यामधून दिली जाते. तसेच, शेतीसाठी आवश्यक कृषी बातमी यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात.
सर्व सप्लायर्स वगार्र्ची प्रोफाईल जाहिरात साप्ताहिकमध्ये प्रसिध्दीस देवून सर्वच कारखानदारापर्यंत पोहचली जाते. या जाहिरातींना सर्वोत्तम प्रतिसाद मिळण्यास मदत होते. आम्ही आपल्या प्रत्येक जाहिराती योग्य सिझनमध्ये प्रसिद्ध करतो. जेणेकरून त्याचा तुुम्हाला फायदा होतो.
याचबरोबर साखर कारखान्यांमधील संस्थापक, अध्यक्ष व अधिकारी वर्गाची आम्ही वाढदिवस माहिती प्रसिध्दी करीत असतो. या उपक्रमास सातत्याने प्रतिसाद असते. हे वृत्तपत्र बरोबरच Web version मध्येही उपलब्ध आहे.
www.weeklysugarnews.com
या वेबमध्ये अपडेट न्युज, पाहिजेत जाहिराती, दररोज असणारे अधिकारी यांचे वाढदिवसाची माहिती, सरकारी नोटीफिकेशन माहिती उपलब्ध आहे. तसेच, सप्लायर्स डिस्प्ले जाहिरातीला अधिक चांगला प्रतिसाद मिळतो.
आजपर्यंत तुमची सर्वांची साथ लाभली असून इथून पुढेही असेच सहकार्य आम्हाला मिळो.
धन्यवाद.
-संपादक