anekant.news@gmail.com

9960806673

साखर आयुक्तांच्या यादीवरील कार्यकारी संचालक नेमणे कारखान्यांना बंधनकारक

जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा कारभार प्रभारीवर, ५० नावाची यादी तयार
कोल्हापूर ः साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यातील अनुभवी ५० कार्यकारी संचालकांच्या नावांची यादी तयार केली आहे. या यादीतील व्यक्तीचीच साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करणे साखर कारखान्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे साखर कारखानदारांना आता प्रभारी कार्यकारी संचालकांवर कारभार करता येणार नाही.
सहकारी साखर कारखान्यातील संंचालकांचे धोरण राबविणे, शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करणे, साखर कारखाना व्यवस्थापनाची जबाबदारी कार्यकारी संचालकांवर असते. साखर उद्योग अडचणीत असतानाही राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये प्रभारी कार्यकारी संचालकांवर कारभार सुरू असल्याने साखर आयुक्त कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. हे कार्यकारी संचालक निवृत्तीपर्यंत पदावर राहू शकतात. त्यांची निश्चिती कालमर्यादा नाही.असे असले तरी त्यांना एक वर्षाचा प्रशिक्षणार्थी कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरातील कामकाज समाधानकारक असणे आवश्यक आहे.
एक वर्षाचा प्रशिक्षणार्थीचा कालावधी समाधानकारक न राहिल्यास त्यांना हटविण्याचा संचालक मंडळाचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.
साखर उद्योग अडचणीतून जात असताना साखर आयुक्त कार्यालयाने पॅनेलवरील अनुभवी व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. साखर कारखान्यांना निश्चित तो उपयोगी ठरेल. - विजय औताडे, साखर तज्ञ (पुढारी, १३.०५.२०२५)