anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात 40 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन

पुणे : राज्यात यंदाचा हंगाम 2024-25 मधील ऊस गाळप जोमाने सुरू असून, सद्य:स्थितीत 8.78 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 40 लाख 51 हजार मेट्रिक टन इतके साखर उत्पादन तयार झाले आहे. 461 लाख 57 हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. ऊस गाळप हंगाम जोमाने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सुमारे 113 लाख 32 हजार मेट्रिक टनांइतके सर्वाधिक ऊस गाळप पूर्ण करून पुणे विभाग आघाडीवर आहे. या विभागात 8.87 टक्के उतार्‍यानुसार 100.51 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. साखर उत्पादन आणि उतार्‍यामध्ये कोल्हापूर विभागाची आघाडी कायम असल्याचेही सांगण्यात आले. कोल्हापूर विभागात 109.78 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे, तर सर्वाधिक म्हणजे 10.37 टक्के उतार्‍यानुसार 113.85 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे.

सोलापूर विभागात 79.85 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 7.62 टक्के उतार्‍यानुसार 60.86 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून 59.08 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 8.19 टक्के सरासरी उतार्‍यानुसार या विभागात 48.4 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे.छत्रपती संभाजीनगर विभागात 41.35 लाख मे. टन साखर उत्पादन, तर 7.32 टक्के उतार्‍यानुसार 30.26 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. नांदेड विभागात 52.2 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 8.95 टक्के उतार्‍यानुसार 46.71 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. अमरावती विभागात 4.89 लाख मे. टन ऊस गाळप आणि 8.3 टक्के उतार्‍यानुसार 4.06 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार झाले आहे.

नागपूर विभागात 1.1 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 4.73 टक्के उतार्‍यानुसार 0.52 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे.प्रतिदिन 9.75 लाख मे. टन ऊस गाळप सुरूराज्यात सद्य:स्थितीत 97 सहकारी आणि 98 खासगी मिळून 195 साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून प्रतिदिन नऊ लाख 75 हजार 50 मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. यानिमित्ताने साखर कारखान्यांचा हंगाम जोमाने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.