मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलापोटी 1 हजार 60 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा समावेश आहे.
राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना 1 हजार 60 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या कारखान्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर झालेल्या कारखान्यांमध्ये शरद सहकारी साखर कारखाना हातकणंगले, सदाशिव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कागल, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना करवीर, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना करवीर, वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखाना आजरा या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर राहता येथील गणेश सहकारी साखर कारखाना, कोपरगाव येथील महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यालाही हे कर्ज मंजूर झाले आहे.