anekant.news@gmail.com

9960806673

सह्याद्रि : चिमणीमध्ये चोकअप झाल्यामुळे साईड प्लेट फाटलेमुळे मोठा आवाज

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामध्ये दिनांक 10/03/2025 पासून नवीन थरमॅक्स मेक 150 टनी बॉयलरचे थरमॅक्स कंपनीचे इंजिनिअर यांचे मार्गदर्शनाखाली व मे. के. बॉव्हेट यांचे लोकांचे मार्फत टेस्टींग व ब्लो ऑफ चे काम चालु आहे. दिनांक 10/03/2025 पासून आज पर्यंत बॉयलर व्यवस्थित चालु आहे. काल दिनांक 19/03/2025 पर्यंत एकुण 16 ब्लो ऑफ दिलेले आहेत.

बॉयलर मधुन निघणारी धुर मिश्रीत राख वेगळी करणेकरीता ई एस पी नावाची यंत्रणा बॉयलर व चिमणीच्या मध्ये बसविलेली असते. हि यंत्रणा चोकअप झाल्यामुळे सदर यंत्रणेची साईड प्लेट फाटलेमुळे मोठा आवाज झालेने सदर ठिकाणी अपघात झालेला आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे आग लागलेली नाही व कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. फक्त सदर ठिकाणी निरीक्षण करणारी लोकं होती ते आवाज झाल्यामुळे पळत असताना त्यातील तीन लोक थोड्या फार प्रमाणात जखमी झालेले आहेत. सदर जखमी लोकांना ताबडतोब कृष्णा चॅरीटेबल टस्ट्र कराड येथे उपचारा करीता पाठविलेले असून त्यांचेवर उपचार झाले आहेत व आज रात्रीपर्यंत त्यांना डिसचार्ज मिळणार आहे. बॉयलर मध्ये मोठा स्फोट झालेला नाही. तरी सभासद शेतकरी बंधुनी विविध सोशल मिडियावर सदर घटनेबाबत प्रदर्शित हाणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये, सदर यंत्रणा दुरुस्त करुन पुन्हा लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती व्यवस्थापनाच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली. (प्रेसनोट, २० मार्च २०२५)