पुणे ः केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी 25 लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मुबलक कोट्यामुळे साखर दरात क्विंटलमागे 25 ते 30 रूपयांनी घसरण होण्याचा अंदाज व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे. एक तर उन्हाळ्यामुळे राहणारी वाढती मागणी लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर दरवाढीस आळा बसून दर स्थिरावण्यासाठी साखरेा मुबलक कोटा जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने 23.50 लाख टन साखरेचा कोटा दिलेला होता. तर गतवर्षी मे महिन्यासाठी 23 लाख टन साखर खुली केली होती. या काळात साखरेची निर्यातही सुरू असल्याने दर तेजीत स्थिरावल्याचे चित्र गतवर्षी दिसून आले. (पुढारी, 27.03.2024)