anekant.news@gmail.com

9960806673

एआय तंत्रज्ञानातून निसराळेत पिकणार ऊस

कृषी विभागाचा पहिला प्रयोग, १०० हेक्टरवर लागवड, ४० टक्के उत्पन्न वाढणार
सातारा ः कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून जिल्ह्यातील निसराळे, ता. सातारा या गावी जवळजवळ १०० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली जाणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून या गावात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १२५ शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना काही हिस्सा आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर विभागात कृषी विभागाचा हा पहिला प्रयोग आहे.
शेतीमध्ये गेल्या काही वर्षात नवीन तंत्रज्ञान व संशोधन समोर आले आहे. यातून पारंपरिक शेती पद्धत बाजूला पडून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयोग सातत्याने होत आहे. आतापर्यंत विविध संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून असे प्रयोग शेतीत होत होते. पण जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीचा प्रयोग करणार आहे.
त्यासाठी सातारा तालुक्यातील निराळे गावाची निवड करण्यात आली आहे. यासाठी कृषी विभाग शेतकर्‍यांना सर्व ती मदत करणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्तावही कृषी विभगाने पाठविला आहे. शेतकर्‍यांचा काही हिस्सा आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक मदतीतून निसराळे गावात हा प्रयोग होणार आहे.
गावातील १२५ शेतकर्‍यांना यामध्ये सामावून घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून १२५ हेक्टर क्षेत्रावर एआयचा वापर करून ऊस लागवड केली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झाले असून त्याचा आराखडाही अंतिम झाला आहे. यापूर्वी गावातील शेतकर्‍यांनी कृषी विभागाची सुपर केन नर्सरीचा प्रयोग यशस्वी केला होता. तसेच विविध ऊस पीक स्पर्धाही तेथे घेण्यात आली होती. आता एआयच्या माध्यमातून ऊस लागवडीचा प्रयोग होत आहे. असा प्रयोग कृषी विभागाच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, विभागात पहिलाच ठरणार आहे.
असे होणार फायदे
* कमी खर्चात अधिक उत्पादन देणार ऊस शेती
* १० ते २० टन उत्पन्न वाढणार
* माती, जमीन, खतांची, वातावरणीय बदलांची माहिती मिळणार
* सेन्सर लावल्याने ओलावा, तापमान बदलाची माहिती समजणार
* सॅटलाइटद्वारे शेताचे मॉनिटरिंग केले जाणार
* तब्बल एक हजार हेक्टरवर प्रयोग होणार
* शेतकर्‍यांच्या उत्पादनात ४० टक्के वाढ होणार
* उत्पादन खर्चात २० टक्के, पाण्यात ३० टक्के बचत
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवडीचा पहिला प्रयोग कृषी विभाग जिल्ह्यात होत आहे. त्यासाठी निसराळे गावातील १२५ शेतकर्‍यांनी पुढाक ार घेतला आहे. त्यातून एआयच्या माध्यमातून ऊस लागवड करणारे या विभागातील पहिले गाव ठरणार आहे. - भाग्यश्री फरांदे, अधीक्षक कृषी अधिकारी (सकाळ, ०६.०४.२०२५)