anekant.news@gmail.com

9960806673

साखरेच्या एमएसपीस पाच वर्षांपासून ब्रेक

दरवाढीबाबत साखर उद्योगाची आग्रही मागणी , सहकारमंत्री अमित शहा यांना साकडे

सोेमेश्‍वरनगर ः केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीत टप्प्याटप्प्याने वाढ झाली. मात्र गेेली साडेपाच वर्षे साखरेची एमएसपी जैसे थे आहे. याबाबत साखर उद्योगातून विविध संस्थांकडून वाढीबाबत आग्रही मागणी होत आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे. यामुळे विधानसभा निवडणूक लागण्याआधी एमएसपी वाढणार का? अशी साखर उद्योगाला आशा वाटू लागली आहे. किंबहुना या चर्चेने साखरेच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने जून 2018 मध्ये पाहिल्यांदा 2900 रूपये प्रतिक्विंटल एमएसपी केली. पुढे फेब्रुवारी 2019 मध्ये एमएसपी 3100 रूपयांवर नेत साखर उद्योगास आधार दिला. त्यावर्षी एफआरपी 2750 रूपये प्रतिटन होती. मात्र तेव्हापासून वाढ केली नाही. दुसरीकडे एफआरपीत साडेपाच वर्षात 650 रूपये प्रतिक्विंटल वाढ झाली असून 2024-25 हंगामात 3400 रूपये प्रतिटन एफआरपी द्यावी लागणार आहे. हा दर शेतकर्‍यांना द्यावा यासाठी एमएसपी किमान 3700 ते 3800 रूपये प्रतिक्विंटल करणे क्रमप्राप्‍त आहे. अन्यथा कारखानदारीची आर्थिक चक्रे गर्तेत अडकण्याची चिन्हे स्पष्ट आहेेत.

* गत हंगामात केंद्र सरकारने उलट साखरेच्या दरात वाढ होंऊ नये यासाठी इथेनॉलनिर्मितीला बंधने घातली.
* साखर निर्यात बंद केली आणि साखर विक्रीचे कोटे वाढवून दिले.
* परिणामी साखरेचे दर 3400 ते 3500 रूपये प्रतिक्विंटलच्याच आसपास अडकले.
* आता 90 लाख टन शिल्लक साखर साठा डोक्यावर घेऊन 2024-25 च्या हंगामास साखर उद्योग सामोरा जात आहे.
* एमएसपी 4200 रूपये करणे, इथेनॉनच्या किमती वाढविणे आणि निर्यात करणे अशा निर्णयांची गरज

मागील 15 वर्षांपासून उसाच्या दरात काही ना काही वाढ झाली. मात्र साखरेच्या किमती ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या दरातही फारशी वाढ झालेली नाहाी. आगामी हंगामासाठी 3400 रूपये प्रतिटन एफआरपी देण्यासाठी एमएसपी वाढविली नाही तर कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहणार आहे. - ऋषीकेश गायकवाड, सोमेश्‍वर संचालक (सकाळ, 08.10.2024)