anekant.news@gmail.com

9960806673

हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू न झाल्यास कारखानदारांचे प्रंचड नूकसान - बी.बी.ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा

म्हाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी पर्जन्यमान अतिशय चांगले झाल्यामूळे, अनुकूल हवामानामूळे व कोरडया वातावरणामूळे साखर उतारा वाढणार आहे आणि सध्या पाऊस थांबल्यामूळे राज्यातील बरेच गूळपावडर व खांडसरी कारखान्यांनी ऊस गाळपास मोठया प्रमाणात सुरूवात केली आहे. मात्र सोशल मिडीया व वृत्तपत्रामधून विधानसभेच्या निवडणूकीचे कारण पूढे करून गळीत हंगाम दि.15 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर पासून सुरू करावा अशा विनंतीवरून शासन गळीत हंगाम पुढे ढकलत असल्याचे समजते.
दि.15 नोव्हेंबर 2024 पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मा. मंत्री समितीमध्ये घेण्यात आला, परंतू खाजगी साखर कारखाना संघटना विस्माने दि. 5 नोव्हेंबर 2024 पासून हंगाम सुरू करणेबाबत मंत्री समितीस विनंती केली होती. गाळप हंगाम जवळपास 15 दिवस उशीरा चालू होत आहे. त्यामूळे अगोदरच ऊसतोडणी व वाहतूक मजूरांचे 15 दिवसांचे उत्पन्न बुडलेले आहे, शेतक-यांच्या ऊसतोडीस 15 ते 20 दिवस विलंब होतो आहे व कारखान्यातील सर्व कर्मचारी व यंत्रणा 15 दिवस बसून आहे.
तसेच भारत सरकारच्या महत्वाकांक्षी इथेनाॅल-पेट्रोल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत तेल विपणन कंपन्याच्या पुरवठा निविदा नुसार नोव्हेंबर 2024 च्या साठयात कमी पुरवठयामूळे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये बाधा येवून, साखर कारखान्यांना दंडात्मक आर्थिक फटका बसेल. तसेच कांही भागांमध्ये ऊस पिकांना हुमणी किडीचा धोका संभोवतो आणि शेतक-यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. तसेच फेब्रूवारी नंतर उन्हाची तिव्रता वाढल्याने ऊस तोड मजूर मार्चमध्ये आप-आपल्या गावी निघून जातात. त्यामूळे उभ्या ऊस पिकाची शेतक-यांपुढे व कारखान्यांच्या समोर मोठया गंभीर समस्या दरवर्षी उभ्या टाकतात व त्यामूळे साखर आयुक्तालय व राज्य शासनापूढे देखील अडचणी निर्माण होतात.
कर्नाटक,गुजरात व मध्यप्रदेश या राज्यामध्ये दि.10 ते 15 नोव्हेंबर 2024 पासून सर्व कारखाने सुरू होत आहेत यामूळे आपल्या राज्यातील बरेच ऊस तोड आणि वाहतूक मजूर कर्नाटकसह इतर राज्यामध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यामूळे ऊस तोड आणि वाहतूक मजूरांच्या संख्येमध्ये प्रचंड घट होवून याचा आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना मोठया प्रमाणात सहन करावा लागेल.
वरील सर्व मूद्दे लक्षात घेवून मा. मंत्री समितीमध्ये दि.15 नोव्हेंबर 2024 पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याप्रमाणे दि.15 नोव्हेंबर 2024 पासून साखर कारखाने सुरू करावेत यामध्ये विलंब होवू नये अशी विनंती विस्माचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी साखर आयुक्तालय, महाराष्ट्र शासनास केल्याचे पत्रकार परिषदेत सांगीतले.