राशिवडे ः येथील भोगावती कारखान्याच्या जनरल मॅनेजरपदी संजय श्रीपती पाटील यांची निवड झाली. यापूर्वी त्यांच्याकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार होता. संजय पाटील यांनी भोगावती साखर कारखान्यातील सेवेला १९९८ साली प्रारंभ केला. तब्बल १८ वर्षे त्यांनी अकौटंट व संगणक विभाग प्रमुखाचा कार्यभार सांभाळला.
त्यानंतर २०१६ ते २०२० पर्यंत ते मंडलिक कारखान्याच्या चिफ अकौटंटपदी काम करीत होते. त्यांनी पुन्हा कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार २०२० पासून आतापर्यंत पाहत होते. आता त्यांची नूतन जनरल मॅनेजरपदी निवड झाली. (पुढारी १४.०७.२०२५)