anekant.news@gmail.com

9960806673

कर्नाटक : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना वाढीव एफआरपी

बेळगाव : साखर विभागाने यंदा उसाला प्रतिटन 3400 रुपये दर द्यावा, असा आदेश कारखान्यांना दिला आहे. त्यामुळे यंदा ऊस उत्पादकांना प्रतिटन 250 रुपये ज्यादा दर मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, साखरेला योग्य भाव मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलन छेडले जाते. यंदाच्या हंगामासाठी अधिक एफआरपी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023-24 च्या गळीत हंगामात प्रतिटन 3150 एफआरपी निश्चित करण्यात आला होता. मात्र यंदा त्यामध्ये प्रतिटन 250 रुपयांची वाढ करून 3400 रुपये करण्यात आला आहे. जिल्ह्यात 18 हून अधिक साखर कारखाने आहेत. राज्यात बेळगाव जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर आहे. एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी ऊस उत्पादकांतून होत होती. त्यानुसार साखर विभागाने साखर कारखान्यांना वाढीव एफआरपीचे आदेश दिले आहेत.