anekant.news@gmail.com

9960806673

सत्ताधारी नेत्याच्या साखर उद्योगास १७ कोटींची व्याजमाफी

निफाड :

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याने भाडेपट्ट्यापोटी संभाजीराजे साखर उद्योग समूहाकडून आकारलेले १७ कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आचारसंहिता लागण्याआधी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय केला असून, त्याचा शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे.

वास्तविक ही व्याजमाफी देण्यास खुद्द वित्त विभागाने विरोध केला होता. मात्र हा साखर उद्योग भाजपच्या एका अतिवरिष्ठ आणि सध्या मोठ्या पदावर असलेल्या मराठवाड्यातील नेत्याशी संबंधित असल्याने हा विरोध झुगारून व्याजमाफी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या कारखानदारांना घाऊक पद्धतीने सवलती दिल्या असून किल्लारी, औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याला ६८९ कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यास आठ वर्षांसाठी समान हप्ते भरण्याची मुदत दिली आहे.

सध्या साखर उद्योगाकडून संबंधित साखर कारखान्याला भाडेपट्टाही मिळत नसल्याने व्याजमाफी देऊ नये, असा शेरा मारला होता. मात्र हा साखर उद्योग मराठवाड्यातील एका मोठ्या भाजप नेत्याशी संबंधित असल्याने मंत्रिमंडळाने वित्त विभागाच्या शेऱ्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.