anekant.news@gmail.com

9960806673

उसाचे गाळप 15 नोव्हेंबरपूर्वी सुरू केल्यास कारवाई

साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिला कडक इशारा

पुणे ः राज्यातील 2024-25 च्या ऊस गाळप हंगामास 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार जे साखर कारखाने गाळप हंगाम 15 नोव्हेंबर पूूर्वी सुरू करतील, अशा कारखान्यांचे चेअरमन आणि कार्यकारी संचालकांंवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणााल खेमनार यांनी दिला आहे.

शासकीय आदेशानुसार प्रत्येक साखर कारखान्यांना दरवर्षी ऊस गाळज्प करण्यापूर्वी गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यावर साखर आयुक्तांनी परिपत्रक जारी करून सर्व सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक व खासगी कारखान्यांचे सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना जारी केल्या आहेत.

येत्या 15 नोव्हेंबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत ऊस गाळप सुरू करू नये. गाळप परवाना घेऊनच 15 नोव्हेंबरपासूनच ऊस गाळप सुरू करावे. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे. संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनाही यासंबंधी सुचना देण्यात आल्या आहेत. शासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्यास तेथील पोलीस निरीक्षकांनी गुन्हे दाखल करावेत, असेही सांगण्यात आले आहे. (पुढारी, 11.10.2024)