कोल्हापूर दि.२१-०६-२०२४: कसबा बावडा येथील श्री छ. राजाराम सह. साखर कारखान्याच्या रिक्त झालेल्या व्हा. चेअरमनपदी श्री. गोविंदा चौगले यांची बिनविरोध निवड करणेत आली. दादू मा.श्री.जी.जी. मावळेसो अध्यासी अधिकारी जिल्हा गरी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मिटींगमध्ये श्री. गोविंदा दादू चौगले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करणेत आली. श्री. गोविंदा दादू चौगले यांचे व्हा. चेअरमन पदासाठी नांव संचालक श्री. तानाजी कृष्णात पाटील यांनी सुचविले व त्यास संचालक श्री. डॉ. विश्वास सदाशिव बिडकर यांनी अनुमोदक दिले. सदर निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आम.श्री. महादेवराव महाडिकसाो यांचे शुभहस्ते मा. अध्यासी अधिकारी श्री.जी.जी. मावळेसो आणि सहायक निवडणूक अधिकारी मा. विजय पाटीलसोो व मावळते व्हा. चेअरमन श्री. नारायण बाळकृष्ण चव्हाण यांचा सत्कार करणेत आला तसेच नवनियुक्त व्हा. चेअरमन श्री. गोविंदा दादू चौगले यांचा सत्कार मा. अध्यासी अधिकारी मा. मावळेसो यांचे शुभहस्ते करणेत आला. श्री. गोविंदा दादू चौगले हे रा. सोन्याची शिरोली, तालुका राधानगरी गावातील आहेत. या निवडीनंतर श्री. गोविंदा दादू चौगले यांनी कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी मा. आम. महादेवराव महाडिकसो यांनी जी संधी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद दिले आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवून त्यांचे मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या उत्कर्षासाठी व प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशिल राहीन असे मनोगत व्यक्त केले आणि संचालक मंडळाचे आभार मानले.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा.आ. अमलजी महाडिकसो तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक श्री. प्रकाश ज. चिटणीस, तसेच कारखान्यातील अधिकारी उपस्थित होते.