anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोडणी वाहतूक ठेकेदारास 2 लाख 57 हजारांचा दंड

भैरवनाथ शुगर सोनारीचा वाहतूक ठेकेदार, दंड न भरल्यास 6 महिन्यांची शिक्षा

परंडा ः तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मुकदम्यावरून भुम तालुक्यातील हिवर्डा येथील ऊसतोडणी वाहतुक ठेकेदार विठ्ठल उत्रेश्‍वर मुंडे यांना भरपाईचे 2 लाख 57 हजार 378 रूपये भरावे अन्यथा 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

भैरवनाथ शुगर सोनारीच्या वतीने ऊसतोडणी वाहतू ठेकेदार विठ्ठल मुंडे यांच्या विरूद्ध साखर कारखान्याला दिलेला चेक अनादरित झाल्याने आरोपी विठ्ठल मुंडे यांच्या विरूद्ध परंडा फौजदारी न्यायालयात चलन श्रम दस्त ऐवज कायदा कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली होती. परंडा न्यायालयाती या फौजदारीत किरकोळ फौजदारी मुकादमा नं. 8/2017 मध्ये सुनावणी होऊन मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मयुरा व्ही. निंबाळकर यांनी आरोपीस कोर्ट उठेपर्यंन्त शिक्षा केली. तसेच नुकसान भरपाई म्हणून चेक ची 2 लाख 57 हजार 378 रूपये ही रक्कम आरोपीने फिर्यादी कारखान्यास देण्याचा आदेश दिला तसेच चेक ची रक्कम आरोपीने फिर्यादी कारखान्यास न दिल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सदरील प्रकरणात फिर्यादी कारखान्याच्या वतीने साक्षीदार म्हणून जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, शंकर सुत्राव नरसाळे, केन अकौटंट श्रावण कोकणे, तुळशीराम बालगुडे यांची साक्ष महत्त्वाची झाली. या प्रकरणात चिफ अकौटंट गोविंद कुलकर्णी यांनी पेहरावी केली. फिर्यादी कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. विवेक एम. काळे यांनी विधीज्ञ म्हणून काम पाहिले. (एकमत, 21.04.2024)