anekant.news@gmail.com

9960806673

सह्याद्रि सह. साखर कारखाना निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

कराड : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक संचालक साखर पुणे विभाग यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.कारखान्याची प्राथमिक मतदार यादी अर्हता दि. 8 फेबु्रवारी 2025 निश्चित करण्यात आली असून या अर्हता दिनांकास अनुसरून संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी व तपासणीसाठी जाहीर करण्यात येत आहे.

ती सभासदांना प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना यशवंतनगर, उपनिबंधक सहकारी संस्था कराड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कडेगाव, तहसील कार्यालय कराड या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होईल.प्रारूप मतदार यादीवर मतदार असणार्‍या कोणत्याही सभासदास किंवा संस्थेच्या वतीने मतदान करण्यास प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस यादीतील नाव किंवा पत्ता तसेच इतर तपशील किंवा चूक कळवू शकतात. संबंधितांनी त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक नोंद करून स्वतंत्ररित्या लेखी स्वरूपात पुराव्यासह आक्षेप, हरकती, प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग कार्यालयात 17 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या तारखेनंतर आलेले आक्षेप, हकरती विचारात घेतल्या जाणार नाहीत. या हरकतीवर निर्णय घेवून मतदार यादी अंतिम करण्यात येईल.

मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम असा आहे, मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे 17 जानेवारी 2025, प्रारूप मतदार यादीवर हरकती व आक्षेप दाखल करणे 17 ते 27 जानेवारी 2025, दाखल हरकती व आक्षेप यावर निर्णय घेणे 3 फेबु्रवारी 2025, अंतिम मतदार यादी प्रसिध्द 7 फेब्रुवारी 2025.