anekant.news@gmail.com

9960806673

माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचे निधन

पुणे ः राज्याचे माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी वय 84 यांचे शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रेड्डी यांनी जिल्हाधिकारी म्हणून धुळे, ठाणे येथे काम केेले होते. राज्याच्या साखर आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या साखर आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सध्याच्या साखर संकुल वास्तूचे भूमिपूजन झाले आणि बांधकांम पूर्ण होऊन या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्याच कारकिर्दीत 1 जानेवारी 2001 रोजी झाले. (पुढारी, 26.04.2024)