anekant.news@gmail.com

9960806673

क्रांतीअग्रणी कारखाना 25 लाख ऊस रोपे तयार करणार ः शरद लाड

कुंडल ः यंदा क्रांतीअग्रणी कारखाना 25 लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. ते कारखाना नर्सरीमध्ये तयार केलेल्या ऊसरोपे तयार करण्याच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी टिशू कच्लर रोपांचे वितरण झाले.

लाड म्हणाले, ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात 8 ते 10 मे.टनाची वाढ होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस रोपांची लागवडीत वाढ झाली आहे. परिसरात एकूण ऊस रोपांच्या लागणीत सुमारे 50 टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून तयार केलेल्या रोपांचा समावेश असते.

ते पुढे म्हणाले, कांती कारखान्यातफर्ें एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी दरवर्षी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये ऊस लागवडीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा व मजू खर्चासाठी अर्थसहाय्य याचा समावेश आहे. काही शेतकरी कांडी पद्धतीने उसाची लागण करतात. तथापि कांडी ऐवजी रोप पद्धतीने लागण केल्यास तुटाळी सांधण्याचा खर्च वाचतो, पाण्याची व मजूर खर्चात बचत होेते. याशिवाय रोप लागवणीमध्ये एकाचवेळी येणारे फुटवे व त्याची समान वाढ यामुळे उत्पादनात वाढ होते. (सकाळ, 28.05.2024)