गडहिंग्लज ः आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर प्रकाश पताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी बंद पाकिटातून पताडे याचे नाव दिले. त्याला सर्व संचालकांनी एकमुखाने सहमती दर्शवित त्यांची निवड केली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा झाली. (सकाळ, 08.10.2024)