anekant.news@gmail.com

9960806673

समर्थ साखर कारखान्यातर्फे १३२ रूपये ऊस दरवाढ जाहीर

माजी मंत्री राजेश टोपे यांची माहिती
वडीगोद्री ः अंबड तालुक्यातील युनिट क्र.१ समर्थ साखर कारखाना यांच्यातर्फे सन २०२४-२५ ला ऊस गाळपास घातलेल्या शेतकर्‍यंसाठी १३२ रूपये ऊस वाढ देण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. एफआरपीपेक्षाही १०० रूपये आपण शेतकर्‍यांना जास्त दिलेले आहेत. या हंगामात २८३२ रूपये अंतिम दर देण्यात आलेला आहे, असेही ते म्हणाले.
समर्थ कारखाना व सागर कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच आम्ही शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत असतो. शेतकर्‍यांच्या ऊस पिकाबद्दल मार्गदर्शन विविध तज्ञांच्या मार्फत आपण करत आहोत. आपण अंतिम वाढ बिल नेहमीच बैल पोळ्याच्या वेळेस देत असतो. परंतु यावेळेस वाढ बील पोळ्याला न देता खरीप हंगामातील तूर, कपाशी आदी पिकांच्या मशागतीसाठी आपण लवकरच अंतिम बिल दिलेले आहे. ते येत्या सोमवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरूवात होईल. (गावकरी, १५.०७.२०२५)