anekant.news@gmail.com

9960806673

sugar writing news

सी.बी.जी. प्रकल्पाचे फायदे, अडचणी व उपाय

भारत सध्या आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 77 टक्के आणि नैसर्गिक गॅसच्या गरजेपैकी सुमारे 50 टक्के आयात करतो. भारत सरकारने ही आयात कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जैव विघटनशील कचरा किंवा जैव पदार्थ जसे कि साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणारे प्रेसमड, स्पेंटवॉश, सांडपाणी प्रक्रिया करणार्‍या घटकांमधून तसेच इतर उद्योगापासून निर्माण होणारा जैव विघटनशील कचरा, शहरातील गावातील राडा रोडा, घरगुती कचरा सांडपाणी प्रक्रिया घटक यामधून प्रक्रिया करीत असताना, शेतातील पाला पाचोळा, याचे जैव विघटन प्रक्रिया केली असता मिथेन गॅसची निर्मिती होत असते.
मिथेन वायू (CH4) हा एक ज्वलनशील वायू आणि स्वच्छ इंधन आहे. याचा वापर आपण एक नवनिर्मितीक्षम इंधन म्हणून करू शकतो. जैव विघटन या प्रक्रियांमध्ये आपणास कच्चा मिथेन वायू मिळतो. म्हणजेच या वायूमध्ये अनेक नको असलेले वायू असतात. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक दृष्ट्या वापर करावयांचा असल्यास या मिश्र वायूचे शुद्धीकरण गरजेचे असते. या मिश्र वायूमध्ये असणारा हायड्रोजन सल्फाईड (H2S) कार्बन डाय ऑक्साईड (CO2) पाण्याची वाफ काढून टाकण्यासाठी बायो गॅस शुद्ध केला जातो (आणि त्यानंतर कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणून संकुचित सिलेंडर मध्ये उच्च दाबामध्ये भरला जातो CBG) ज्यामध्ये 90 टक्के पेक्षा जास्त शुद्ध मिथेन वायू असतो.
CBG हा एक स्वच्छ ऊर्जा श्रोत आह. ज्याचा उष्मांक मूल्या इतर गुणधर्म हे CNG प्रमाणेच आहेत, म्हणून ऑटोमोटिव्ह, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सीएनजीला पर्यायी ऊर्जा म्हणून वापरण्यास योग्य आहे. आपल्या देशामध्ये कचर्‍याची मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे व सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडत चालले आहे. सोबतच पेट्रोलजन्य घटकांच्या वापरामुळे होत असलेले प्रदूषण एखाद्या भस्मासुरा प्रमाणे पर्यावरण, शेतजमीन नापिक करण्यापर्यंत पोहोचले आहे. त्याला आळा घालण्यासाठी इंधनामध्ये बायो सीएनजी (कॉम्प्रेस्ड बायो गॅस- CBG)आणि स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (PROM) यांच्या उत्पादनाकडे वळावे लागेल. हा वायू आपण सीएनजीवर चालू शकणार्‍या वाहने, कारखाने, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये वापरता येतो. सध्या अशा प्रक्रिया उद्योगामध्ये (हॉटेल्स) एलपीजी किंवा डिझेल किंवा प्रोपेन यांचा वापर होतो.
सतत योजना ः केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाने ऑक्टोबर 2018 मध्ये सतत (SATAT -Sustainable Alternative Towards Affordable Transportation)) ही योजना जाहीर केली. त्या अंतर्गत बायो सीएनजी निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित सीएनजी विक्री व वितरण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. बायो सीएनजीच्या माध्यमातून पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करणे, उपलब्ध घनकचरा, ओला सेंद्रिय कचरा यापासून बायो गॅस मिळवून योग्य प्रक्रिया करणे, सेंद्रिय खतांची उपलब्धता वाढवणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती असे उद्देश आहेत. 2025 पर्यंत 5 हजार प्रकल्प संपूर्ण भारतभरात उभारण्याच्या उद्देशाने अंदाजे 1,75,000 कोटी रूपयांची तरतूदही केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. महाराष्ट्र नॅचरल गॅस लि., सी.बी.जी.ची तिरण प्रणाली उपलब्ध केली जाईल. वरील कंंपन्या फ क्त वितरण प्रणाली उपलब्ध करून देणार आहेत. ही खरेदीची हमी नव्हे, हे लक्षात घ्यावे. म्हणजेच जेेवढा गॅॅस विकला जाईल त्याप्रमाणे उत्पादकाला पैसे मिळतील. सा सर्व कंपन्या दररोज किमान 2000 किलो सी.बी.जी. उत्पादनाची मागणी करतात.
सीबीजीचे व्यावसायिक स्तरावर्ती उत्पादन केल्यास खालीेल आयदेे आहेत.
* नैसर्गिक वायू आणि क्रूडची आयात कमी होण्यास मदत होऊ शकतेे.
* सीबीजी उत्पादनासाठी शेतीचेे अवशेष, गुरांचेे शेण, उद्योगमध्ये, शहरामध्ये निमार्र्ण होणारा कचरा सांडपाणी यापासून होेणारे पाण, वायू, मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी याचा फायदा होईल.
* हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी चालना मिळेल.
* ऊर्जा सुरक्षेची चिंता आणि क्रूड/गॅसच्या किंमतीतील चढ-उतारांविरूद्ध बफर प्रदान करणे.
* जबाबदार कचर्‍याद्वारे स्वच्छ भारत मिशनमध्ये योगदान व्यवस्थापन करण्यास मदत.
* प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे.
* शेतकर्‍यांना महसुलीचे अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध करून देणे, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे.
* नव उद्योग निर्मिती होऊ शकते.
* साखर उद्योगांना अतिरिक्त उत्पन्न होईल.
सी.बी.जी. निर्मिती व्यावसायिक स्तरावर्ती करण्यासाठी काही मूलभूत अडचणीही आहेत त्या खालीलप्रमाणेः
* 2000 किलो सी.बी.जी. उत्पादनासाठी किमान 50 ते 60 टन कच्च्या मालाचा अखंडित पुरवठा आवश्यकता आहे. तांत्रिक मार्गदर्शन, यंत्रे, गुंतवणूकदार उपलब्ध होतील. मात्र कच्च्या मालाचा अखंडित पुरवठा हे एक मोठे आव्हान आहे.
* ओला कचरा उपलब्ध होण्यार्‍या पोल्टी फार्म, मोठी डेअरी प्रोसेसिंग फार्म, प्रेसमड. भाजी पाला व फळ बाजार व अन्न प्रक्रिया उद्योगातील शिल्लक अवशेष यांचे जिथून आहे तिथून वाहतूक करावी लागेल.
* बायो गॅसमधील कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, सिलोक्सझेन हे व अन्य अशुद्ध घटक वेगळे करून मुख्य घटक मिथेनल वायू 95 टक्क्यांपेक्षा शुद्ध करण्याची यंत्रणा खर्चिक व महाग आहे.
* मिथेन 250 बार या उच्च दाबाखाली विशिष्ट टाक्यांमध्ये भरला जातो. या शुद्ध वायूला बायो सीएनजी (सी.बी.जी.) म्हणतात. केंद्र शासनाने ठरवलेले गुणवत्ता निकष पूर्ण करावे लागतात.
उपाय योजनाः
* अशा प्रकारच्या प्रकल्प उभारणीसाठी कच्च्या मालाची किंमत ही प्रति किलो एक ते सव्वा रूपया पेक्षा जास्त असून चालणार नाही. साखर कारखान्यातील प्रेसमड कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतो. पण त्याची उपलब्धता केवळ 180 ते 200 दिवस असल्याने पर्यायी विचार करावा लागेल. पर्याय म्हणून नेपियर ग्रास उत्तम ठरू शकतो. कारण तो चारा, पशुखाद्य आणि इंधन अशा तिन्हींसाठी उपयुक्त आहे.
* हा प्रकल्प केवळ सी.बी.जी.च्या उत्पन्नातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही, कारण सी.बी.जी.चा उत्पादन खर्च हा किमान 28 रूपये प्रति किलो येतो. म्हणून या प्रकल्पातून बाहेर पडणार्‍य स्लरीपासून खत विशेषतः उच्च स्फरदयुक्त खत-प्रॉम दाणेदार किंवा द्रवरूप बनवावे लागेल. त्याच्या विक्रीसाठी साखळी उभारावी लागेल. प्रॉम हे संपूर्ण सेंद्रिय असून सध्या वापरल्या जाणार्‍या डीएपी आणि एसएसपीला पर्याय म्हणून वापरता येते. ((Fertilizer Control Order 2012 नुसार प्रमाणित) महाराष्ट्र राज्यात वर्षाकाठी 40 लाख टन स्फुरदयुक्त खताचा वापर होतो. हे लक्षात घेतल्यास मागणीचा अंदांज येऊ शकतो. बायोगॅसमधून निघणार्‍या स्लरीला द्रवरूप खत म्हणून मान्यता मिळाली आहे. (केंद्र शासनाने 31 मे 2021 रोजी द्रवरूप खतांच्या निकषातील बदलानुसार) वरील दोन्ही खते ही जमिनीच्या सुपिकतेसाठी फायद्याची ठरणार आहेत.
नेपियर गवतासाठी संधी ः नेपियर ग्रास हे चारा पीक ऊर्जा पिकही मानले जाते. एकरी वार्षिक साधारण 100 ते 120 टन उत्पादन देते. एकदा लागवड केल्यानंतर 5 वर्षापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता आहे. लागवडीसाठी सुरूवातीला प्रतिएकर साधारणतः 50 हजार रूपये खर्च होतो. पुढील 5 वर्षे एकरी एक ते सव्वालाख रूपये (अंदाजे) उत्पन्न मिळू शकते. 100 टन गवतापासून 12 हजार घनमीटर बायो गॅस मिळतो. पूर्ण शुद्धतेनंतर त्यातून 5 टन (5000 किलो) सीएनजी मिळतो. यासाठी बायोगॅस उभारणी, विशिष्ट प्रकारची शुद्धीकरण यंत्रणा व अति उच्च दाबाचा कॉम्प्रेसर व सीएनजी सिलिंडर्स इ.ची आवश्यकता असते. हे एकरी उत्पादनाचे वाषिक गणित असून दररोज 5 टन सीएनजी उत्पादनासाठी किमान 400 ते 500 एकर क्षेत्र आवश्यक असेल. - लेखक ः भरतेश कामते (साखर निर्मिती तज्ज्ञ) दादासाहेब माळी (पर्यावरण तज्ज्ञ) (प्रेसनोट, 20.08.2024)