anekant.news@gmail.com

9960806673

॥ गीत श्रावणाचे ॥

आला आला श्रावण महिना
भुरळ पडली
तकाळया मेघांना
बिजलीचे तांडव सहन होईना
रिमझिम पावसाने केली दैना ॥१॥
सणवाराचे दिस आले
झाडाला झोके बांधले
देवदर्शना गर्दी वाढली
व्रतवैकले सुरू जाहली ॥२॥
गर्दी वाढली सुट्ट्यांनी
हिरवेगार डोंगर बघुनी
नदीनाल्यांचे गीत ऐकुनी
हर्षोल्हास नाचे मनी ॥३॥
माय लेकरात मोद भरे
गायवासरात आनंद उरे
किल्मिष कंटक दुर करे
सापडले मौत्तिक खरे ॥४॥
बालगोपालही बागडति
पहा पाखंरे गाणे गाति
बघा मोद भरे चोहिकडे
बीज अंकुरले शेताकडे ॥५॥
ऊनपावसाचा खेळ बघता
श्रावणमासाचे गीत ऐकता
श्रावण मासि हर्ष मानसी
मग दु:खाची होईल वापसी ॥६॥

रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९६८७८२९८२