माझीच रूपे किनारा
सीमा बंधारा उंबरा
मी बनलो लाकडाचा
दगड उंबरठ्याचा ॥1॥
मर्यादा पुरूषोत्तम
आज्ञाधारक श्रीराम
संस्काराचा चारित्र्याचा
रक्षक उंबरठ्याचा ॥2॥
अतिथीसाठी सीतेने
आलांडली सीमारेषा
पुढे रामायण झाले
दरारा उंबरठ्याचा ॥3॥
वेलीवरच्या फुलांचे
बोल ऐका अंतरीचे
अबला स्रीला वाटतो
आधार उंबरठ्याचा ॥4॥
गेला रणी शिलेदार
दसरा शिलांगणाला
विजयी होऊन येई
रूबाब उंबरठ्याचा ॥5॥
सर्वांसाठी सर्व जण
एकत्रित कुटुंबात
कामे करा आनंदात
मान हा उंबरठ्याचा ॥६॥
संपूर्ण नाव -वाळू रघुनाथ आहेर
शिक्षण-बी.ई.एमआयई.बीओई