साखर उद्योगाकडून चालविल्या जाणाऱ्या सहवीज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शरद पवार व कोजन असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत ११ किंवा २५ जानेवारी २०२५ या पुरस्काराचे वितरण होण्याची शक्यता आहे. विविध वर्गवारीत उत्तम काम करणाऱ्या प्रकल्प व त्यातील कर्मचाऱ्यांना एकूण ३३ पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्कारप्राप्त कारखान्यांची नावे अशी :
उत्कृष्ट सहकारी सहवीज निर्मिती प्रकल्प (जादा बॉयलर प्रेशर क्षमता गट) :प्रथम - सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, द्वितीय - राजारामबापू सहकारी साखर कारखाना, तृतीय - सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना.
(जादा बॉयलर क्षमता गट) विशेष श्रेणी पारितोषिके : श्री दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना व दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना.(कमी बॉयलर क्षमता गट) विशेष श्रेणी पारितोषिके : सी. बी. कोरे सहकारी साखर कारखाना (कर्नाटक), छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखानाउत्कृष्ट खासगी सहवीज निर्मिती प्रकल्प (जादा बॉयलर प्रेशर क्षमता गट) : प्रथम - पोन्नी शुगर्स (तमिळनाडू), द्वितीय - जी ७ शुगर्स (पूर्वीचा गंगाखेड शुगर),
(जादा बॉयलर क्षमता गट) विशेष श्रेणी पारितोषिके : दालमिया भारत शुगर (पूर्वीचा श्री दत्त शुगर), राजश्री शुगर्स (तमिळनाडू) व सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी (महाराष्ट्र).उत्कृष्ट खासगी सहवीज निर्मिती प्रकल्प (कमी बॉयलर प्रेशर क्षमता गट) : प्रथम - गोदावरी बायोरिफायनरीज (कर्नाटक), द्वितीय - ईआयडी प्यॅरी इंडिया (कर्नाटक).
उत्कृष्ट सहवीज (कोजन) व्यवस्थापक : सहकारी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - विजयकुमार इंगळे, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिरोळ), सहकारी व कमी बॉयलर प्रेशर क्षमता गटात - संदीप राजगोंडा भोजे, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, खासगी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - चंद्रशेखरन, पोन्नी शुगर्स (तमिळनाडू), खासगी व कमी बॉयलर क्षमता गटात - जी.सूर्यप्रकाश राव, गोदावरी बायोरिफायनरीज (कर्नाटक).
उत्कृष्ट सामग्री (इन्स्ट्रुमेंटेशन) व्यवस्थापक : सहकारी व जादा बॉयलर क्षमता गटात - रामेश्वर पांडुरंग सदरे, लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना, सहकारी व कमी बॉयलर प्रेशर क्षमता गटात - शिवाजी जनार्दन साळुंखे, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना,
खासगी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - अनिलकुमार गंगवाल, दालमिया शुगर्स (उत्तर प्रदेश) तसेच विशेष श्रेणीत विमलनाथन, शक्ती शुगर्स, (तमिळनाडू) व मनीष कुमार अगरवाल, दालमिया भारत शुगर्स (आधीचा श्री दत्त शुगर), खासगी व कमी बॉयलर प्रेशर क्षमता गटात - विरेश शेट्टर, ईआयडी प्यॅरी इंडिया (कर्नाटक).
उत्कृष्ट जलशुद्धीकरण (डीएम प्लॅन्ट) व्यवस्थापक : सहकारी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - रामचंद्र तोरसे, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, सहकारी व कमी बॉयलर प्रेशरक्षमता गटात - सागर तुकाराम वंजेरी, सी. बी. कोरे सहकारी साखर कारखाना, (कर्नाटक), खासगी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - नीरज सक्सेना, द्वारिकेश शुगर्स (उत्तर प्रदेश).
उत्कृष्ट विद्युत (इलेक्ट्रिकल) व्यवस्थापक : सहकारी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - प्रशांत वसंतराव लोले, श्री. तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, सहकारी व कमी बॉयलर प्रेशर क्षमता गटात - किरण रावसाहेब साजने, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, खासगी व जादा बॉयलर प्रेशर क्षमता गटात - बापूगौडा पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी.