सांगली ः जिल्ह्यातील वसंतदादा साखर कारखाना या कारखान्याची २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली होती. दि. ३ फेब्रुवारीपासून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटची तारीख होती. तीन दिवस इच्छुक उमेदवारांशी खा. विशाल पाटील यांनी चर्चा करून कारखाना व सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली होती.
त्यांच्या इच्छेला मान देऊन सर्व इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सर्व गटातील उमेदवारांनी सहकार्याची भूमिका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, विजय पाटील, दिवाकर पाटील, ऑडिट कर्मचारी सोसायटी सचिव यांचे सहकार्य लाभले. निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व इच्छुक उमेदवारांचे खासदार विशाल पाटील यांनी आभार मानले. (महासत्ता, २७.०२.२०२५)