निपाणी ः येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खा. अण्णासाहेब जोल्ले, आ. शशिकला जोल्ले यांच्या प्रेरणेतून नव्याने स्थापित केलेल्या केंद्र सरकारच्या इंधनमध्ये इथेनॉल मिसळणे हा प्रकल्प निर्माण केला आहे. प्रतिदिन 150 हजार लिटर सामर्थ्याचा इथेनॉल उत्पादन घटकाचा प्रारंभ कारखान्याचे चेअरमन एम.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हालसिद्धनाथ प्रतिमा पूजन आणि इथेनॉल घटकाच्या यंत्रणेचे पूजा करून इथेनॉल उत्पादनसाठी चालना देण्यात आली. (महासत्ता, 04.02.2024)